Join us

राज्यातील ७१ टक्के रुग्ण महामुंबईतील; २४ तासांत मुंबईत १३८ कोरोना रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 7:00 AM

राज्यात १,८३८ कोरोनाबाधित; १८७ नवे रुग्ण, १७ मृत्यूंची नोंद; राज्याचा मृत्यूदर ५.५ टक्के

मुंबई : राज्यात शनिवारी १८७ कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ८३८ वर पोहोचली आहे. तर राज्यात शनिवारी १७ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या १२७ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत मुंबईतही १३८ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून येथील रुग्णसंख्या १,१४६ वर पोहोचली आहे.

राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी मुंबईत ६१ टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात १० टक्के तर पुणे येथे २० टक्के रुग्ण आढळले आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के आहे. शहर-उपनगरात दादर-धारावीसारख्या परिसरात वेगाने कोरोनाचा फैलाव होतो आहे. शनिवारी दादरमध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाचे निदान झाले, तर धारावीतही कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे येथील असून उर्वरित ९ टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागांतील आहेत. रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर पाच टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.नवी मुंबईमध्ये एकाचा मृत्यूनवी मुंबईत कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या ३५ झाली आहे. बेलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला असून नेरूळमधील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याला ही प्रादुर्भाव झाला आहे.दादरमध्ये एकाच कुटुंबातीलपाच जणांना कोरोनादादर पश्चिम येथील चितळे पथ येथे राहणाºया कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांना कोरोना झाल्याचे चाचणीतून उघड झाले आहे. तसेच एन.सी. केळकर मार्गावर राहणाºया ५१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे दादर मधील बाधितांची संख्या ११ झाली.कोरोनाचे १२७ बळीराज्यात शनिवारी १७ मृत्यूंची नोंद झाली. यातील मुंबईचे १२, पुण्याचे २, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी एक आहे. मृत्यूंपैकी ११ पुरूष तर ६ महिला आहेत. १७ मृत्यूंपैकी सहा जण हे साठ वर्षांवरील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या १७ पैकी १६ रुग्णांमध्ये ९४ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार आढळले. राज्यातील एकूण मृतांचा आकडा १२७ वर पोहोचला.३४,०९४ नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २०८ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या राज्यात ३८ हजार ८०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ९६३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ४६४१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १७ लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई