Join us

माउंटमेरी जत्रेनिमित 400 नागरिकांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 9:04 PM

मदर मेरी (माउन्ट ऑफ अवर लेडी) यांच्या जयंती निमित्त माउंटमेरी बांद्रा येथे रविवार दि,१० सप्टेंबर ते रविवार १७ सप्टेंबर पर्यंत माउंटमेरी जत्रा आयोजित केली जाते.

मुंबई - मदर मेरी (माउन्ट ऑफ अवर लेडी) यांच्या जयंती निमित्त माउंटमेरी बांद्रा येथे रविवार दि,१० सप्टेंबर ते रविवार १७ सप्टेंबर पर्यंत माउंटमेरी जत्रा आयोजित केली जाते. सात दिवसाच्या या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी मोठ्या आनंदात व उत्साहात जयंती साजरी करण्यात येते.माउंटमेरी जत्रेनिमित 400 नागरिकांनी घेतला मोफत बस प्रवासाचे आयोजन मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे म्हाडा सभापती राज्यमंत्री दर्जा डॉ. विनोद  घोसाळकर यांनी केले होते.

सलग ८ वर्ष मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे डॉ. विनोद  घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या आयोजनाखाली माउंटमेरी तीर्थक्षेत्राला भेट देणेयासाठी, प्रार्थना करण्यासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी प्रभाग क्र १ मधील नागरिकांना मोफत आठ बसेसची व्यवस्था करण्यात येते. आज आय. सी. काॅलनी बोरिवली प. येथील अंदाजे ४०० तीर्थयात्रे करूनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला.सदर वेळी मुंबै बॅंक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक जुडीत मेंडाेसा, शिवसैनिक व स्थनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई