Join us  

क्रेडिट कार्ड फसवणुकीचे ४०० गुन्हे; ४ महिन्यांत ४८ गुन्ह्यांची उकल, सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 10:40 AM

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईत सायबर गुन्ह्यांशी संबंधित १७६० प्रकरणांची नोंद झाली.

मुंबई : गेल्या चार महिन्यांत मुंबईत क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन फसवणुकीचे सुमारे ४०० गुन्हे नोंद झाले असून यांपैकी अवघ्या ४८ गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.  

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईत सायबर गुन्ह्यांशी संबंधित १७६० प्रकरणांची नोंद झाली. त्यांपैकी ३४१ गुन्ह्यांची उकल करण्यात येऊन ४१० जणांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कारवाईचा वेग वाढला आहे. क्रेडिट कार्ड/ ऑनलाइन फसवणुकीचे सर्वाधिक ३९९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ गुन्ह्यांचा छडा लावून  ५८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

१) ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर सायबर पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून आपले पैसे वाचवता येतील. 

२) आतापर्यंत पोलिसांनी अनेक प्रकरणांचा छडा लावून सायबर भामट्यांनी लांबवलेले पैसे वाचविले आहेत. कुणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

सायबर फसवणुकीचे १०७४ गुन्हे नोंद असून १९० गुन्ह्यांची उकल झाली आहे. फसवणुकीत कस्टम गिफ्ट (३२), खरेदी (३५), नोकरी (१८८), बनावट वेबसाइट (३६), गुंतवणूक (२६६), कर्ज (२५) यांचा समावेश आहे. 

१) तक्रारदाराने पोलिसांशी तत्काळ संपर्क साधल्यास सायबर पथक संबंधित खात्याची तपासणी करते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली, याची माहिती घेतली जाते. 

२) ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून तत्काळ रक्कम गोठवण्यात येते. 

३) बँकेकडे पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा वळती करण्यात येते. आर्थिक फसवणूक करणाऱ्यांकडून आतापर्यंत ६७.२ कोटी रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस