मुंबई : उष्णतेच्या लाटेपासून सुटका करण्यासाठी एसी, पंखे, कूलरसारखी विजेची उपकरणे अतिवेगाने चालविली जात असून, त्यांचा वापरही वाढला आहे. परिणामी मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ होत असून, मंगळवारी मुंबईत ४ हजार ४१ मेगावॉट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली आहे. चालू हंगामातील आतापर्यंतची ही सर्वाधिक मागणी असून, राज्याची मागणी २४ हजार २३४ मेगावॉट नोंदविण्यात आली आहे.
१) सर्वसाधारण दिवशी मुंबईच्या विजेची मागणी ३ हजार २०० मेगावॉट किंवा ३ हजार ४०० मेगावॉटच्या आसपास नोंदविली जाते.
२) हिवाळ्यात हा आकडा २ हजार ८०० किंवा ३ हजार मेगावॉटच्या आसपास असतो. उन्हाळ्यात मात्र विजेची मागणी सर्वाधिक नोंदविली जाते.
३) दोन दिवसांपासून उष्णतेच्या झळा बसत आहेत. दिवसासह रात्रीच्या उकाड्याने मुंबईकरांना हैराण केले आहे. अशातच या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून एसी, पंखा, कूलरसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे.
४) राज्यात मंगळवारी दुपारी ३:१५ वाजता २४ हजार २३४ मेगावॉट विजेची मागणी होती व पुरवठाही तेवढा करण्यात आला. भारनियमन कुठेही करावे लागले नाही.