अत्यावश्यक सेवेतील लोकलमधून सुमारे ४.२४ लाख प्रवाशांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 09:52 PM2020-06-23T21:52:18+5:302020-06-23T21:53:54+5:30
राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे.
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवा सुरु आहे. मागील एका आठवड्यात एकूण ४ लाख २४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला सुमारे १ कोटी ७७ लाख रुपयांचे महसूल मिळाला आहे.
राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गवरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून एकूण ३६२ फेऱ्या धावत आहेत.
सर्व लोकल या १२ डब्यांच्या लोकल धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर कसारा/कर्जत/कल्याण ते सीएसएमटी दोन्ही दिशेकडे १३० फेऱ्या , हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी दोन्ही दिशेकडे ७० फेऱ्या धावत आहेत. १५ जून ते २२ जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरून ९३ हजार ८३४ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वे प्रशासनाला १ कोटी २० लाख रुपयांचा महसूल मिळाला. तर, २३ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार ५२७ प्रवाशांनी प्रवास केला.
पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते चर्चगेट दोन्ही दिशेकडे १४६ फेऱ्या आणि विरार ते डहाणू रोड दोन्ही दिशेकडे १६ फेऱ्या धावत आहेत. यातून १५ जून ते २२ जूनपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावरून ३ लाख २१ हजार ८३९ प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वे प्रशासनाला ५२ लाख १३ हजार रुपयांचा महसूल मिळाला.
आणखी बातम्या...
वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!