रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आठवड्याभरात ५० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:08 AM2021-09-07T04:08:47+5:302021-09-07T04:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून बळी गेलेल्या कोरोना रुग्णांचा रुग्णालयात आठवड्याभरात मृत्यू झाल्याचे निरीक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून बळी गेलेल्या कोरोना रुग्णांचा रुग्णालयात आठवड्याभरात मृत्यू झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. राज्यातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीनच दिवसांत झाले आहेत.
राज्यातील पहिल्या कोरोनाच्या लाटेतील ३९ हजार ६८८ रुग्ण आणि दुसऱ्या लाटेतील ६० हजार २२ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३१.५ टक्के मृत्यू १ ते ३ दिवसांत, तर २२.४ टक्के मृत्यू हे ४ ते ६ दिवसांत झाले आहेत. याखेरीज, ५३.९ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सहा दिवसांच्या कालावधीत झाले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही २३.७ टक्के मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ३ ते ६ दिवसांच्या कालावधीत झाले आहेत, तर ५४ टक्के मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सहाव्या दिवशी ओढावले आहेत.
राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, मृत्यू विश्लेषणातील निष्कर्ष चिंताजनक आहे. रुग्णाचा रुग्णालयातील उपचारांचा कालावधी कमी असल्याचे दिसून येते. म्हणजे रुग्ण लक्षणानंतर वा निदानानंतर त्वरित डॉक्टरकडे येत नाही वा रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करतात. म्हणजेच वैद्यकीय वर्तुळास अपेक्षित असलेली कोरोनाविषयक जनजागृती अजूनही झालेली नाही, ही खेदजनक स्थिती आहे.
मार्च २०२० ते जानेवारी २०२१ - ३९,६८८ रुग्णांचे मृत्यू
फेब्रुवारी २०२१ ते २० ऑगस्ट – ६०,०२२ रुग्णांचे मृत्य
दिवस मार्च २०२० ते जानेवारी २०२१ फेब्रुवारी २०२१ ते २० ऑगस्ट
१ ते ३ १२,५०१ १८०३३
४ ते ६ ८,८९० १४२४८
७ ते ९ ५८९० ९८११
१० ते १२ ४३४७ ६८५७
१३ ते १५ २९११ ४३१०
१६ ते १८ १८६५ २६३९
१९ ते २१ ११४१ १५१२
२२ ते २४ ७५५ ९१५
२५ ते २७ ४९५ ५२५
२८ ते ३० २९५ ३५५
३१ ते ३३ ३०६ ३९३
३४ ते ३६ १६९ २७०
३७ ते ३९ १२३ १५४