तलावांमध्ये पन्नास टक्के जलसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 01:30 AM2018-07-15T01:30:38+5:302018-07-15T01:30:55+5:30
मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये दररोज सरासरी ३० ते ४० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होत आहे.
मुंबई : मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये दररोज सरासरी ३० ते ४० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आता निम्मे भरले आहेत. यापैकी तुळशी तलाव भरून वाहत असून लवकरच विहार तलाव भरण्याची शक्यता
आहे.
गेल्या वर्षी याच दरम्यान तलावांमध्ये ५४ टक्के जलसाठा जमा झाला होता. या वर्षी पावसाने जून महिन्यात काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने दमदार इनिंग सुरू ठेवली आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने वाढत आहे. पावसाळ्याचे आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने तलाव काठोकाठ भरण्याची आशा आहे.
मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर
हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये निम्मा म्हणजे ७ लाख १९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.
>जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.५६
तानसा १२८.६३ ११८.८७ १२६.३४
विहार ८०.१२ ७३.९२ ७९.७१
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.२२
अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९८.५७
भातसा १४२.०७ १०४.९० १२२.९५
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २७०.२४