Join us

दोन दिवसांत पकडली ८ किलो सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

By मनोज गडनीस | Published: April 08, 2024 5:28 PM

पदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांतर्फे सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मनोज गडनीस, मुंबई : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने वाढताना दिसत असून ६ आणि ७ एप्रिल अशा दोन दिवशी मुंबई विमातळावर एकूण ८ किलो १० ग्रॅम सोने पकडण्यात आले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. एकूण १२ प्रकरणांत कारवाई करत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सोन्याची जप्ती केली आहे.

 या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांतर्फे सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने संबंधित विमानांच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचत या आरोपींना अटक केली आहे. यापैकी काही सोने परिधान केलेल्या कपड्या, बॅगेत, बॅगेमध्ये चोर कप्पे तयार करत लपविले होते. तर, एका प्रकरणात आरोपीने सोने शरीरात लपविल्याचे देखीळ आढळून आले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस