मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ १२ जानेवारी रोजी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून १३ फेब्रुवारीपर्यंत ८ लाख १३ हजार ७७४ वाहने या पुलावरून धावली आहेत. या मार्गाचा वापर केल्याने टोल स्वरूपात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला १३ कोटी ९५ लाख ८५ हजार ३१० रुपये प्राप्त झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूची उभारणी केली आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी अटल सेतूची ओळख आहे.
नुकतेच सेतून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. सेतूमुळे मुंबई-नवी मुंबईचे अंतर कमी झाले असून, अवघ्या २० मिनिटांत हा २१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करता येत आहे. तसेच दक्षिण भारतासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी झाले आहे. सेतू खुला झाल्यानंतर प्रवाशांनी त्याचा पिकनिक पॉइंटसारखा वापर केला होता. वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर येथील वाहतुकीला शिस्त लागली आहे.
फास्ट टॅगद्वारे १३ कोटी ७० लाख ९६ हजार ८१५ महसूल मिळाला आहे.
रोख रकमेद्वारे ८७ लाख ४ हजार ९२५ महसूल मिळाला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
या वाहनांनी केला प्रवास :
कार : ७ लाख ९७ हजार ७८
एलसीव्ही/मिनी बस : ३ हजार ५१६
बस, २ एक्स ट्रक : ४ हजार ७७८
एमएव्ही ३ एक्सेल : २ हजार १७२
एमएव्ही ४/६ एक्सेल : ५ हजार ७०९
अवजड वाहने : २१