Join us  

मुंबईतील ८९ ठिकाणे हिरवीगार होणार! महापालिकेची ४८ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:22 AM

मुंबईत उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे.

मुंबई : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी संपूर्ण स्वच्छता मोहीम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी कायमस्वरूपी  प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी आता मुंबई महालिकेने मुंबई हिरवीगार करण्याचा संकल्प सोडला आहे. याअंतर्गत उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगाने मंजूर  केलेल्या ४८ कोटी रुपयांपैकी १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

या माध्यमातून एकूणच हरित क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईतील ८९ ठिकाणी हिरवळ फुलवली जाणार आहे. राज्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हरित क्षेत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी एक योजना केंद्र सरकारने हाती घेतली असून, त्यात मुंबई महापालिका सहभागी झाली आहे. या योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी  सध्या रस्ते धुणे, स्प्रिंकलच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, मुंबई अस्वच्छ करणाऱ्यावर  दंडात्मक कारवाई करणे आदी उपाय योजले जात आहेत; मात्र हे कायमस्वरूपी  उपाय ठरू शकत नाहीत. काँक्रीटच्या जंगलातील आहे.

   गृहसंकुलांसह मोकळ्या जागा, उद्याने, मैदाने व अन्य ठिकाणी झाडे लावली जाणार आहेत. उद्यान विभागातर्फे उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक यामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता हिरवळ, रोपांची लागवड, शहरी वनीकरण करण्याकरिता  रंगरंगोटी, नामफलक, लहान मुलांची खेळांची साधने, पदपथ  कामे केली जाणार आहेत. परिमंडळ २ मध्ये २ उद्याने, परिमंडळ ३ मध्ये २०, परिमंडळ ४ मध्ये १३, परिमंडळ ५ मध्ये ११, परिमंडळ  ६ मध्ये १३ आणि परिमंडळ ७ मध्ये २३ उद्यानांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका