मुंबई :मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार, तर उपनगर जिल्ह्यात ७२ लाख १७ हजार ३०८ इतके मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना आपल्या घराजवळच मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जवळपास साडेनऊ हजार मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. वेगवेगळ्या श्रेणीत ही मतदान केंद्रे विभागली गेली आहेत. हाैसिंग सोसायटी परिसरात आणि फिरते मतदान केंद्रसुद्धा यावेळी असणार आहे.
लोकसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्रे
२६ मुंबई उत्तर १७०१
२७ मुंबई उत्तर पूर्व १७५३
२८ मुंबई उत्तर पश्चिम १६८१
२९ मुंबई उत्तर मध्य १६९६
३० मुंबई दक्षिण मध्य १४२९
३१ मुंबई दक्षिण १०८०
५७ हजार कर्मचारी सज्ज-
मुंबईतील शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी १२ हजार ४०० कर्मचारी, तर उपनगर जिल्हा केंद्रांसाठी ४५ हजार कर्मचारी तैनात आहेत.
मुंबई शहरातील संवेदनशील मतदान केंद्रे - ८९
सहाय्यकारी मतदान केंद्र - ८६
सखी महिला मतदान केंद्र - ३७
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र - ३४