Join us

व्हॉटस् अॅपद्वारे घडवली रिक्षाचालकाला अद्दल

By admin | Published: July 30, 2014 2:24 AM

व्हॉटस् अॅपचा वापर अन्यायाविरोधात लढण्यासही होऊ शकतो हे घाटकोपरमध्ये राहणा:या तरुणीने दाखवून दिले. या तरुणीने व्हॉटस् अॅपच्या मदतीने चक्क मुजोर रिक्षाचालकास अद्दल घडवली.

मुंबई : व्हॉटस् अॅपचा वापर अन्यायाविरोधात लढण्यासही होऊ शकतो हे घाटकोपरमध्ये राहणा:या तरुणीने दाखवून दिले. या तरुणीने व्हॉटस् अॅपच्या मदतीने चक्क मुजोर रिक्षाचालकास अद्दल घडवली. 
ही तरुणी रविवारी संध्याकाळी आजीसोबत रिक्षाने घरी परतत होती. इमारतीजवळ आल्यावर रिक्षा थांबली. तेव्हा आजी वृद्ध आहे, तिला लिफ्टर्पयत चालणो शक्य नाही, रिक्षा इमारतीच्या जिन्यार्पयत न्या, अशी विनंती तिने केले. मात्र चालकाने हुज्जत घातली. त्याच्या मुजोरीमुळे अखेर नातीला आणि वृद्ध आजीला तेथेच उतरावे लागले. मात्र त्याआधी नातीने रिक्षाचालकाचा, रिक्षाचा फोटो मोबाइलमध्ये टिपून घेतला. घरी जाताच हे फोटो आणि चालकाच्या मुजोरीबाबतचा मेसेज तिने व्हॉटस् अॅपवरून मित्र-मैत्रिणींना धाडला आणि तो थेट पोलिसांर्पयत पोहोचला. (प्रतिनिधी)
 
अन्यायाचा हा मेसेज व्हॉटस् अॅपद्वारे वेगाने फिरला. पोलीस आयुक्त राकेश मारियांर्पयत तो धडकल्यावर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. आज विक्रोळी वाहतूक पोलिसांनी त्या मुजोर रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. रूद्र प्रताप दीक्षित असे त्याचे नाव आहे.