ई-सातबारे आता ‘ओपन क्लाऊड’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:29 AM2020-06-10T06:29:15+5:302020-06-10T06:29:27+5:30
आता केवळ ३ लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरीत आणणे शिल्लक आहे.
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : राज्य शासनाच्या महाभूमी अभिलेख विभागाच्या वतीने आता राज्यभरातील सर्व ई सातबारे ‘ओपन क्लाउडवर’ घेतले आहेत. यामुळे काही संकेदामध्ये सातबारा डाउनलोड होण्यास मदत होणार आहे. राज्यात एकूण सातबारांंची संख्या २ कोटी ५२ लाख असून, आतापर्यंत २ कोटी ४९ लाख ई-सातबारे (डिजिटल स्वाक्षरीत) पूर्ण झाले आहेत.
आता केवळ ३ लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरीत आणणे शिल्लक आहे. आतापर्यंत राज्यातील सर्व ई- सातबारा पुण्यातील एनआयसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. यामुळे सातबारा डाउनलोड होण्यासाठी खूप वेळ लागायचा. संकेतस्थळ हँग होणे, बंद पडण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे भूमीअभिलेख विभागाच्या वतीने आता राज्यभरातील सर्व ई-सातबारा ओपन क्लाउडवर टाकण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांत दररोज १५ ते २० हजारपर्यंत डाउनलोड होऊ लागले आहेत.