Join us  

एमएमआरमध्ये अकरावीच्या सुमारे चार लाख जागा; यंदा २५ हजार जागांची भर

By रेश्मा शिवडेकर | Published: June 06, 2024 9:25 PM

एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७वरून १,०४५ इतकी वाढली आहे. त्यामुळे अर्थात जागांमध्येही वाढ झाली आहे. सध्या अकरावीकरिता प्रेफरन्स भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

मुंबई - मुंबईसह ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या एमएमआर क्षेत्रातील अकरावीच्या जागांमध्ये सुमारे २५ हजारांची भर पडली आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी ३,९९,२३५ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी ३.७५ लाख जागा या क्षेत्रात उपलब्ध होत्या.

एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७वरून १,०४५ इतकी वाढली आहे. त्यामुळे अर्थात जागांमध्येही वाढ झाली आहे. सध्या अकरावीकरिता प्रेफरन्स भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती १६ जूनपर्यंत चालणार आहे. २६ जूनला मुलांनी भरलेल्या प्रेफरन्सनुसार जागा वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी गेल्या वर्षीचे कटऑफ वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया जुलैपर्यंत संपविण्याचा विचार आहे.

एमएमआरमध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे चार लाख जागांपैकी १,५१,७३५ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन अशा विविध कोट्यातील आहेत. या कोट्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबत सुरू राहील.

एकूण शाखानिहाय जागा

कला - ५२,३१०

कॉमर्स - २,०८,५२०

सायन्स - १,३३,४४०

एचएसव्हीसी - ४,९६५

कोटानिहाय जागा

इनहाऊस कोटा - २६,२१३

अल्पसंख्याक - १,००,९५५

व्यवस्थापन - १८,५६७

कॅपसाठी उपलब्ध असलेल्या शाखानिहाय जागा

कला - ३४,६८९

कॉमर्स - १,२५,९२१

सायन्स - ८३,६०८

एचएसव्हीसी - ३,२८२

ठाणे जिल्ह्यातील जागा

एकूण जागा - १,४०,९१०

कला - २१,४२०

कॉमर्स - ६६,९८०

सायन्स - ५१,५८०

एचएसव्हीसी - ९३०