पाण्यासारखा पैसा...भातसाच्या जलशुद्धीसाठी २०० कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:46 AM2024-02-12T09:46:14+5:302024-02-12T09:49:08+5:30
ठाण्याच्या पांजरापुरात १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी.
मुंबई : मुंबईला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे १०० दशलक्ष लीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भातसा धरणातील १०० दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी महापालिका २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून देण्यात आली. या प्रकल्प उभारणीसाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. भातसा धरणातून मुंबईला दररोज दोन हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. त्यापैकी पांजरापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात १३६५ दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करण्यात येते, तर ६०० दशलक्ष लीटर पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पात ६०० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी मुंबईला पुरवठा केला जातो. परंतु, तालुका भिवंडी, ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे जागा उपलब्ध आहे.
पांजरापूर येथ नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पांजरापूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यानंतर तेथे १०० दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करत ते थेट मुंबईला पुरवठा करण्यात येईल, असे पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.
भांडुपलाही जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती :
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. सध्या या ठिकाणी १९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प असून, नवीन प्रकल्पात याची क्षमता २००० दशलक्ष लीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधून पूर्ण होईपर्यंत जुना प्रकल्प सुरू ठेवण्यात येणार आहे. नवीन प्रकल्प बांधून झाल्यानंतर त्याला सर्व यंत्रणा जोडण्यात येणार आहेत. जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपत आल्यामुळे पालिकेने हा साडे तीन हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला असून, त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.
मुंबईला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे १०० दशलक्ष लीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भातसा धरणातील १०० दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी महापालिका २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून देण्यात आली. या प्रकल्प उभारणीसाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.