एक कोटीची ब्राऊनशुगर हस्तगत, अंबोली पोलिसांची कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:30 AM2017-09-12T04:30:43+5:302017-09-12T04:31:05+5:30

एक कोटीची ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात अंबोली पोलिसांना सोमवारी यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नुकतीच मेफेड्रोन या अंमली पदार्थाची फॅक्टरी उध्वस्त केल्यानंतर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राऊनशुगर हस्तगत करणे अंबोली पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

 Abridged police brigade of 1 crore, Amboli police action | एक कोटीची ब्राऊनशुगर हस्तगत, अंबोली पोलिसांची कारवाई  

एक कोटीची ब्राऊनशुगर हस्तगत, अंबोली पोलिसांची कारवाई  

Next

मुंबई : एक कोटीची ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात अंबोली पोलिसांना सोमवारी यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नुकतीच मेफेड्रोन या अंमली पदार्थाची फॅक्टरी उध्वस्त केल्यानंतर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राऊनशुगर हस्तगत करणे अंबोली पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. जितेश राठोर (२३) आणि नटवर सिंह भाटी ऊर्फ विजय (२७) ही दोघांची नावे आहेत.
उपनगरात अंमली पदार्थांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहिम सध्या परिमंडळ नऊचे पोलीस उपायुक्त देहिया यांच्या पथकाने कारवाई सुरु केली. अंधेरी परिसरात काही लोक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती नायक यांना मिळाली. त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी त्यांनी पथकासह अंधेरी पश्चिमच्या वीरा देसाई रोडजवळ सापळा रचला. तेव्हा राठोड या परिसरात संशयास्पद वावरताना दिसला. त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे अर्धा किलो ब्राऊन शुगर पोलिसांना सापडली. त्यानुसार त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीसांनी सांगितले.
अटकेनंतर राठोडची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने हे अंमली पदार्थ विजयकडून आणल्याचे कबुल केले. तसेच विजय हा १० सप्टेंबरला अंधेरी लिंक रोड परिसरात अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याचे त्यांना समजले. तेव्हा लिंक रोड परिसरातही सापळा रचून नायक यांच्या पथकाने विजयच्याही मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे अर्धा किलो ब्राऊन शुगर सापडली. जी हस्तगत करत त्याला अटक करण्यात आली.
हे सर्व अंमली पदार्थ त्यांनी विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांकडे कबुल केले आहे. या दोघांकडील ब्राऊन शुगरची स्थानिक बाजारपेठेत ३० लाख रुपये किंमत असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती १ कोटी रुपये असल्याची माहिती तपास अधिकाºयांनी दिली. त्यांची कसुन चौकशी सुरू असुन त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.

Web Title:  Abridged police brigade of 1 crore, Amboli police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.