मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या अंधेरी येथील आठ दुकांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने बजावलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. एमएआरसीएल अशा प्रकारे बांधकाम पाडण्याचे अधिकार नाहीत, असे सकृतदर्शनी मत उच्च न्यायालयाने नोंदविले.३ एप्रिल रोजी एमएमआरसीएलने अंधेरी येथील आठ दुकानांना जागा खाली करण्यासंबंधी नोटीस बजावली. या दुकान मालकांनी जागा खाली करण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यापूर्वी पर्यायी जागा देण्याची विनंती एमएमआरसीएला केली.त्यावर न्यायालयाने एमएआरसीएला अशा प्रकारे बांधकाम पाडण्याचे अधिकार नाहीत, असे सकृतदर्शनी मत नोंदवित एमएमआरसीएलला नोटीस बजावली. उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला २२ एप्रिल रोजी या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देशदिले, तसेच या आठ दुकानांवर कारवाई न करण्याचे निर्देशही एमएमआरसीएला दिले.
मेट्रो-३च्या मार्गातील दुकानांना अभय - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:01 AM