Join us

फेरीवाल्यांच्या विळख्यात भायखळा मंडई जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:28 PM

भायखळा पूर्वेकडील महापालिकेच्या अखत्यारित असलेली संत गाडगे महाराज मंडई जीर्णावस्थेत आहे.

चेतन ननावरेमुंबई : भायखळा पूर्वेकडील महापालिकेच्या अखत्यारित असलेली संत गाडगे महाराज मंडई जीर्णावस्थेत आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेल्या या मंडईला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. २००५पासून मंडईचा पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे़ आता येथील परवानाधारक गाळेधारकांमध्येही गट पडल्याचे दिसते.येथील एकूण ५३५ गाळेधारकांची नोंद मनपाकडे आहे. भाजीपाला आणि फळांची चढ-उतार करण्यासाठी माल वाहतूक गाड्या मंडईत येतात. परिणामी, येथील वाहतुकीचा बोजवारा उडतो. मनपाने दिलेला गाळा कमी पडत असल्याने फळ विक्रेत्यांकडून पदपथावरच फळांची मांडणी केली जाते. पुरेशी शौचालये या ठिकाणी असली, तरी मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने त्यात अस्वच्छता दिसते. गाळाधारकांच्या डोक्यावरील छप्पर पावसाळ्यात गळत असते़ ते कधीही कोसळू शकते़ मंडईचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकाविरोधात उच्च न्यायालयात काही व्यापारी गेले आहेत.>फेरीवाल्यांविरोधात गाळेधारकांची कोणतीही तक्रार आलेली नाही. पुनर्विकास नेमक्या कोणत्या टप्प्यात आहे, ते सांगता येणार नाही. गाळेधारकांनी विनंती केल्यास नक्कीच या प्रकरणात लक्ष घालून पुनर्विकास प्रकल्प योग्यरित्या हाताळला जाईल.- सुरेखा लोखंडे, स्थानिक नगरसेविका.