Join us

अनेक मंत्र्यांची गैरहजेरी; उपमुख्यमंत्र्यांची दिलगिरी, अजित पवारांनी चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 6:06 AM

पूर्वी सभागृहात तीन लक्षवेधी असत. आता १५ असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मंत्री सभागृहात हजर राहत नाहीत, त्यांना कामकाजात रसच नाही; ते करतात तरी काय? निर्लज्जपणाने कळस गाठला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत मंत्र्यांनाच झापले. अजित पवारांच्या या संतापाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि मंत्र्यांना आपण समज देऊ असे सांगत विषयावर पडदा टाकला.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकाळी नियमित कामकाजापूर्वी सभागृहाची विशेष बैठक घेऊन तीत आठ लक्षवेधी सूचनांवर चर्चा लावली होती. मात्र, विविध मंत्रीच सभागृहात नसल्याने सात लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागल्या. 

संबंधित मंत्री सभागृहात नसल्याने कामकाज तहकूब करावे लागणे, कामकाज पुढे ढकलावे लागणे असे प्रकार या अधिवेशनात घडत आहेत. नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवत अजित पवार यांनी रौद्ररुप धारण केले. कामकाजाबाबत अतिशय गलिच्छपणा चालला आहे, अशा शब्दात त्यांनी सुनावले.

मंत्र्यांच्या गैरहजेरीचे समर्थन नाहीच  

फडणवीस म्हणाले की, मंत्री गैरहजर असल्याचे मी मुळीच समर्थन करणार नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आजची कामकाज पत्रिका रात्री एकला निघाली. त्यामुळे लक्षवेधींबाबत अधिकाऱ्यांकडून ब्रिफिंग घेण्यास मंत्र्यांना वेळ मिळाला नाही. पूर्वी सभागृहात तीन लक्षवेधी असत. आता १५ असतात. तरीही मंत्र्यांनी हजर राहायला हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनदेवेंद्र फडणवीसअजित पवार