लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे द्वितीय पुत्र पूर्वेश सरनाईक हे सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले.
टॉप्स सिक्युरिटी ग्रुपच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने त्याला साेमवारी कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र, त्याने हजेरी न लावल्याने त्याला पुन्हा समन्स बजावण्यात येतील, असे सांगण्यात येते.
सर्वोच्च न्यायालयाने, प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्याचे आदेश ईडीला दिले आहेत. त्यामुळे ईडीला त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळेपर्यंत ते केवळ पत्रव्यवहार करून चौकशीसाठी पचारण करू शकतात. सरनाईक यांचे मोठे पुत्र विहंग सरनाईक याच्याकडे २४ नोव्हेंबरला ईडीच्या आधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.
गेल्या महिन्यात सरनाईक यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात एका पाकिस्तानी नागरिकांच्या नावाचे कॅलिफोर्निया बँकेचे क्रेडिट कार्ड मिळाल्याचे सांगण्यात येते. सरनाईक यांनी मात्र याला नकार दिला आहे.