मुंबई - नशिबात असेल तरच लॉटरी लागते असं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. पण मुंबईकर असलेल्या रवींद्र भुल्लर या व्यक्तीच्या आयुष्यात हे प्रत्यक्षात घडलंय. लॉटरी लागल्याचं समजताच अनेकांच्या मनात आनंद होतो. नशीबवान लोकांनाच लॉटरी लागते असं सांगितलं जातं मात्र चक्क करोडो रुपयांचा लॉटरी लागली तर..तुम्हीही ऐकून थक्क व्हाल.
आतापर्यंत अनेकजण लॉटरीमुळे करोडपती, तर कुणी लखपती बनले आहेत. मुंबईतील एका व्यक्तीने संयुक्त अरब अमीरातमध्ये लॉटरीचे तिकीट काढले. रवींद्र भुल्लर असं या व्यक्तीचे नाव असून 27 लाख डॉलर(म्हणजे 18.65 करोड रुपये) चे भुल्लर यांनी लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं.
दुबईवरुन प्रसिद्ध होत असलेला खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय वंशाच्या रवींद्र भुल्लर यांना ही लॉटरी लागल्याची बातमी दिलीय. बुधवारी हा ड्रॉ अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय हवाई विमानतळावर आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी भुल्लर हे मुंबईत होते. त्यामुळे त्यांना तातडीने याची माहिती देणं शक्य झालं नाही. आयोजकांनी भुल्लर यांच्या मुलीला संपर्क साधल्यानंतर त्यांच्या मुलीने माहिती दिली आहे. भुल्लर हे मुंबईत आहे एका आठवड्यानंतर त्यांच्याशी संपर्क होईल. यानंतर एका आठवड्याने भुल्लर यांना लॉटरी लागल्याचे समजले.
याआधीही फेब्रुवारी महिन्यात अबू धाबीमध्ये भारतीय निवासी असणाऱ्या व्यक्तीला ही लॉटरी लागली होती. बिग तिकीट लॉटरी चौथ्यांदा एका भारतीय व्यक्तीला लागली आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यात प्रशांत पंडरथील या भारतीय वंशाच्या व्यक्तीला लॉटरी लागली होती. त्यांना 19.45 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. पंडरथी यांनी अबूधाबीमध्ये बिग तिकीटमध्ये ऑनलाईन तिकीट खरेदी केलं होतं. बिग तिकीट अबू धाबीमध्ये रोख पुरस्कार आणि लक्झरी कारसाठी सर्वात मोठी आणि सर्वात जुनी प्रसिद्ध लॉटरी स्पर्धा आहे.