मुंबई : पैलू न पाडलेल्या हि-याची (कच्च्या हिºयाची) विदेशातून आयात करताना कमी किंमतीच्या हि-यांची किंमत कितीतरी पटीने फुगवून व्यवहार केले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यातून परकीय चलनाचा गैरवापर होत असून गेल्या काही वर्षांत अशा व्यवहारांत हजारो कोटींचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता हिरे व्यापारातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) भारत डायमंड बोर्स (बीडीबी) मधील दोन हजार कोटी रूपयांचे मनी लॉन्डिंÑग रॅकेट नुकतेच उद््ध्वस्त केले. त्यातून या शक्यतेला दुजोरा मिळाला. अशा व्यवहारांसाठी हवाला पध्दत वापरली जात असून परकीय चलनाचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.कमी दर्जाच्या हिºयांची किंमत अनेक पटीने वाढवून दाखवून गैरव्यवहार करण्याचे प्रकार गेल्या काही काळात वाढीस लागले आहेत. नीरव मोदी व मेहुल चोक्सी प्रकरणातून हे समोर आले होते. असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना आखण्याची व कठोर कारवाई करण्याची मागणी हिरे व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञ हार्दिक हुंडिया यांनी केली आहे. डीआरआयने केलेली कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक असून डीआरआयने सखोल व दबावरहित चौकशी केली, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. कमी दर्जाच्या हिºयांची किंमत वाढवून देण्याच्या प्रकारात अनेकांचे संगनमत असून या साखळीद्वारे कोेट्यवधींचे व्यवहार करून हिºयांची विदेशातून आयात केली जाते. त्यापोटी परकीय चलन दिले जाते. देशाच्या नागरिकांची ही फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. या रॅकेटमध्ये अनेक मोठ्या व्यापाºयांचा समावेश असल्याचा आरोप हुंडिया यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणात दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कच्च्या हिऱ्याची किंमत फुगवून परकीय चलनाचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 6:24 AM