मीरारोड - दिड वर्षा पासून प्रेम संबंध असताना तरुणाचा धर्म वेगळा म्हणून लग्नास प्रेयसीने नकार दिला . त्याचा राग येऊन त्या प्रियकर तरुणाने खाजगी छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण , लैंगिक अत्याचार केला तसेच थुंकी चाटायला लावली अशी तक्रार तरुणीने दिल्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे .
काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल ह्या गुन्ह्यातील आरोपी मीरारोडचा इम्तियाज चौधरी ह्याला पोलिसांनी अटक केली आहे . इम्तियाज व ठाण्यात राहणाऱ्या तरुणीचे गेल्या दिड वर्षां पासून प्रेमसंबंध होते . परंतु प्रियकराचा धर्म वेगळा असल्याने काही दिवसां पूर्वी प्रेयसीने लग्नास नकार देत प्रियकराशी संपर्क तोडला होता .
परंतु इम्तियाज हा प्रेयसीला भेटण्यासाठी प्रयत्न करत होता . मध्यंतरी कोलकत्ता येथे गेलेला इम्तियाज जानेवारी महिन्यात परत आला होता . त्याने तरुणीला काशीमीरा भागातील लॉज मध्ये भेटण्यास बोलावले असता तिने नकार दिला . त्याने तिची खाजगी छायाचित्रे व व्हिडीओ कल्प व्हायरल करण्याची धमकी दिली . त्यामुळे घाबरलेली तरुणी त्याला भेटण्यासाठी २९ जानेवारी रोजी काशीमीरा येथील लॉज मध्ये आली .
लॉज मध्ये त्याने तिला धमकावून लैंगिक अत्याचार केला . त्याने थुंकलेली थुंकी तिला जबरदस्तीने चाटायला लावली. कुठे वाच्यता केली तर मारण्याची धमकी दिली अश्या स्वरूपाची तक्रार त्या तरुणीने पोलिसात दिल्यावर बुधवारी इम्तियाज विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे . आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून लॉजच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेज , मोबाईल आदींची पडताळणी करत असल्याचे पोलिसां कडून सांगण्यात आले .