पोलिस दलात मराठी अधिकाऱ्यांची पिळवणूक, माजी पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:46 AM2023-10-14T09:46:59+5:302023-10-14T09:50:01+5:30

राज्याबाहेरून आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. त्यांचे खच्चीकरण केले जाते, अशी खंत गुप्त विभागाचे माजी पोलीस आयुक्त अॅड. हरिसिंग साबळे यांनी येथे केली.

Abuse of Marathi officers in police force, former police commissioner expressed regret | पोलिस दलात मराठी अधिकाऱ्यांची पिळवणूक, माजी पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली खंत

पोलिस दलात मराठी अधिकाऱ्यांची पिळवणूक, माजी पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली खंत

मुंबई : राज्यासह मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले अनेक महाराष्ट्रीय अधिकारी, कर्मचारी उत्तम काम करीत आहेत. मात्र, राज्याबाहेरून आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. त्यांचे खच्चीकरण केले जाते, अशी खंत गुप्त विभागाचे माजी पोलीस आयुक्त अॅड. हरिसिंग साबळे यांनी येथे केली.

मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य शासनाने पोलिसांच्या प्रश्नांकडे लक्ष दयावे, अशी मागणी केली. अमराठी अधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या यंत्रणेत मराठी अधिकांऱ्याना बसू देत नाहीत,  असे ते म्हणाले.

कसा अन्याय केला जातो, याला फोडली वाचा
- मराठी पोलिस अधिकारी आणि  कर्मचारी यांना कशा प्रकारे दूरच्या पोस्टिंगवर पाठवले जाते. 
- त्याचा प्रत्यक्ष छळ कसा केला जातो?, 
- प्रसंगी त्यांना बढती आणि पारितोषिके मिळताना कसे डावलले जाते, 
- खोटी शपथपत्रके सादर करून काही अमराठी अधिकारी सेवेत कसे काम करीत नाहीत, याबाबत साबळे यांनी माहिती दिली. 
- हे सगळे जनसामान्यांमध्ये माहित व्हावे आणि राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून परिषद घेत असल्याचे साबळे म्हणाले.
 

Web Title: Abuse of Marathi officers in police force, former police commissioner expressed regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.