AC Local: एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:43 PM2023-02-04T12:43:26+5:302023-02-04T12:44:06+5:30

AC Local: यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना चालना देण्यासाठी एक हजार १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपी प्रकल्पांसाठी २६०० कोटींचा निधी मागितला होता. 

AC Local: AC Local will increase, focus on completion of additional routes | AC Local: एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर

AC Local: एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर

Next

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना चालना देण्यासाठी एक हजार १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपी प्रकल्पांसाठी २६०० कोटींचा निधी मागितला होता. 
मागील अर्थसंकल्पात एमयुटीपीसाठी ५७५ कोटींचा निधी दिला होता. यंदा कोणतेही नवे प्रकल्प जाहीर न करता सुरू असलेल्या, रखडलेल्या किंवा याआधी परवानगी मिळालेल्या प्रकल्पांना निधी देण्यास प्राधान्य दिले आहे. केंद्राच्या रकमेएवढी रक्कम राज्य सरकारला द्यावी लागेल. त्यामुळे एमयुटीपीला एकंदर २२०० कोटी मिळतील.

रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के अधिक निधी दिल्याने एमयुटीपी प्रकल्पांना गती मिळेल. जेथे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे, अशी कामे प्राधान्याने 
पूर्ण केली जातील. एमयुटीपी ३ ए प्रकल्पांचे भूसंपादन वेगाने सुरू केले जाईल. 
- सुभाष चंद गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

ही कामे पूर्ण करण्यावर भर 
एमयुटीपी २ च्या १५० कोटींतून मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग, सीएसएमटी-कुर्ला पाचवा- सहावा मार्ग. एमयुटीपी ३ च्या ६५० कोटींतून विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, एमयुटीपी ३ अंतर्गत ४७ आणि एमयुटीपी ३ ए अंतर्गत १९१ अशा २३८ वातानुकूलित लोकल खरेदी करणे, रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखणे, एमयुटीपी ३ ए च्या ३०० कोटींतून सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, पनवेल ते विरार उपनगरी मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा उभारणे या कामांचा समावेश आहे.

Web Title: AC Local: AC Local will increase, focus on completion of additional routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.