एसी लोकल नाताळपासून , रेल्वेमंत्र्यांची घोषणा; प्रवाशांना विशेष भेट, पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:09 AM2017-11-28T06:09:04+5:302017-11-28T06:09:48+5:30

मुंबई लोकल सेवेतील बहुप्रतीक्षित वातानुकूलित (एसी) लोकल २५ डिसेंबरला धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या एसी लोकलला सर्व संबंधित परवानग्या मिळाल्या आहेत. नाताळची विशेष भेट म्हणून मुंबईकरांच्या सेवेत एसी लोकल दाखल होणार असल्याची

 AC Local, announce the announcement of the train march; Special visit to the passengers, inspecting the bridge | एसी लोकल नाताळपासून , रेल्वेमंत्र्यांची घोषणा; प्रवाशांना विशेष भेट, पुलाची पाहणी

एसी लोकल नाताळपासून , रेल्वेमंत्र्यांची घोषणा; प्रवाशांना विशेष भेट, पुलाची पाहणी

Next

- महेश चेमटे
मुंबई : मुंबई लोकल सेवेतील बहुप्रतीक्षित वातानुकूलित (एसी) लोकल २५ डिसेंबरला धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या एसी लोकलला सर्व संबंधित परवानग्या मिळाल्या आहेत. नाताळची विशेष भेट म्हणून मुंबईकरांच्या सेवेत एसी लोकल दाखल होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. सोमवारी लष्करी पूल पाहणी आणि स्थानक भेटीनंतर रेल्वेमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात ही घोषणा केली.
करी रोड येथे खासगी जमीन मालकाच्या जागेच्या वादामुळे या पुलाच्या कामाला विलंब होत होता. तथापि, आता तो वाद मिटला असून, दिलेल्या वेळेतच लष्कराने हाती घेतलेल्या तिन्ही पुलांचे काम पूर्ण होणार असल्याचेही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पाहणी दौºयाच्या वेळी स्पष्ट केले.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी तीन स्थानकांवर लष्कराच्या मदतीने पादचारी पूल तयार करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेमंत्राच्या आदेशानुसार पुलाचे काम सुरू झाले होते. कामाच्या पाहणीसाठी रेल्वेमंत्री गोयल यांनी मुंबईला भेट दिली. या वेळी करी रोड येथील पुलाच्या कामाबाबतही चर्चा केली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्तादेखील या वेळी उपस्थित होते. या दौºयाची माहिती रेल्वेच्या अधिकाºयांकडून अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. रेल्वेच्या अन्य अधिकाºयांनादेखील या दौºयाची कल्पना सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास देण्यात आली.
रेल्वेमंत्री येणार असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे युद्ध स्तरावर साफसफाईचे काम हाती घेण्यात आले, तर दुसरीकडे रेल्वेमंत्री सुरुवातीला एल्फिन्स्टन रोडच्या पुलाची पाहणी करण्यात येणार असल्याने, या स्थानकाला पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांनी वेढा दिला.
एल्फिन्स्टन येथील लष्कराच्या कामाची पाहणी केल्यानंतर रेल्वेमंत्री म्हणाले की, काम योग्य पद्धतीने सुरू आहे. निर्धारित वेळेपूर्वीच हे काम पूर्ण होईल. तिन्ही पूल डेडलाइनपूर्वीच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.

आजारी पडल्याने रेल्वेमंत्री रुग्णालयात
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना रात्री आठच्या सुमारास पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यात त्यांना काही उलट्या झाल्याचेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यांना ब्रीच कॅन्डीला हलविले. किडनी स्टोनचा त्रास बळावल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या गोयल यांची प्रकृती स्थिर असल्याचे ब्रीच कॅन्डीतील सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title:  AC Local, announce the announcement of the train march; Special visit to the passengers, inspecting the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.