Join us  

आता मध्य रेल्वेमार्गावरही धावणार एसी लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 5:25 AM

मध्य रेल्वेमार्गावर ६ एसी लोकल धावणार आहेत. त्यापैकी दोन एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसी लोकल प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर ६ एसी लोकल धावणार आहेत. त्यापैकी दोन एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसी लोकल प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाने एकूण १२ एसी लोकल आणण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामधील पश्चिम रेल्वेमार्गावर ६ लोकल धावतील. तर मध्य रेल्वेमार्गावर मार्च महिन्याच्या अखेरीस १२ डब्यांच्या दोन एसी लोकल दाखल होणार आहेत. त्या कोणत्या मार्गावर चालवाव्यात यासंदर्भातील नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. एकूण नवीन १२ एसी लोकलमधील पहिली लोकल पश्चिम मार्गावर दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरी आणि तिसरी लोकल मध्य; चौथी, पाचवी, सहावी लोकल पश्चिम; सातवी, आठवी लोकल मध्य; नववी, दहावी लोकल पश्चिम; अकरावी व बारावी लोकल मध्य रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार आहे. या लोकल ‘भेल’ या कंपनीकडून बनविण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमार्गावर प्रत्येकी ६ एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. मार्च महिन्यांच्या अखेरीस मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकल दाखल होणार आहे.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :लोकल