एसी लोकलच्या महिला बोगीत बॅरिकेड्स-महाव्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:03 AM2017-12-30T06:03:41+5:302017-12-30T06:03:53+5:30

एसी लोकलमध्ये महिला आणि पुरुष बोगींची रचना सलग आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बोगीत बॅरिकेड्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी दिली.

AC local women boards Barricades-General Manager | एसी लोकलच्या महिला बोगीत बॅरिकेड्स-महाव्यवस्थापक

एसी लोकलच्या महिला बोगीत बॅरिकेड्स-महाव्यवस्थापक

Next

मुंबई : एसी लोकलमध्ये महिला आणि पुरुष बोगींची रचना सलग आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बोगीत बॅरिकेड्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी दिली. चर्चगेट येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
एसी लोकलमधील महिला प्रवाशांनी अन्य लोकलमध्ये विशेष बोगीची मागणी केली आहे. एसी लोकलमध्ये सलग बोगींची रचना आहे. एकमेकांसोबत या बोगी जोडण्यात आल्या आहेत. महिला बोगीत पुरुष प्रवाशांना बंदी आहे. बोगीच्या सलग रचनेमुळे महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. गर्दीच्या काळात तसेच महिला सुरक्षितता लक्षात घेत महिला बोगीत बॅरिकेड्स बसवण्यात येणार आहे. बॅरिकेड्स नियोजनाच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सध्या एसी लोकलमध्ये पहिली आणि शेवटची बोगी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. लवकरच एसी लोकलमध्ये महिला आणि पुरुष बोगीमध्ये वर्गीकरणासाठी बॅरिकेड्सची उभारणी करण्यात येणार आहे.

Web Title: AC local women boards Barricades-General Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.