अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन
By मनोज गडनीस | Published: November 16, 2023 08:23 PM2023-11-16T20:23:40+5:302023-11-16T20:24:33+5:30
कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली.
मुंबई - प्रवासासाठी आवश्यक चेकइन व अन्य सुविधा ऑनलाईन पद्धतीने पुरवणाऱ्या संगकणीय व्यवस्थेत बिघाड झाल्याचा फटका अकासा विमान कंपनीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुरुवारी बसला. कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली.
सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. अनेक लोक विमान प्रवासास प्राधान्य देताना देखील दिसत आहे. ऑनलाईन बुकिंग व चेक-इन करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र, कंपनीची ऑनलाईन प्रणाली अचानक हँग झाल्यामुळे कंपनीच्या विमानांतर्फे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सोसावा लागला.