Join us  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; तक्रारदाराला पैसे परत मिळवून देण्यासाठी एक लाखांची मागणी

By मनीषा म्हात्रे | Published: July 09, 2024 6:18 PM

ही रक्कम त्यांच्याकडून ताब्यात घेत एसीबीकडून अधिक तपास सुरु आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल (५६) हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहे.  तक्रारदाराला फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली १ लाखांची मागणी केली.  तडजोडी अंती ३५ हजारांची रोकड स्वीकारताना त्यांच्यावर सोमवारी कारवाई करण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या परिचयातील एका महिलेला क्रेडिट सोसायटीद्वारे पैसे दुप्पट करून देणार असल्याचे असल्याचे सांगून त्यांच्याकडून २७ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यापैकी फक्त १७ लाख ५० हजार रुपये परत केले. मात्र  उर्वरित रक्कम परत करण्यास महिलेने टाळाटाळ सुरु केली. तक्रारदार व त्यांची पत्नीने महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशांची विचारणा केली. तेव्हा, महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावून बागुल यांच्यासमोर हजर करण्यात आले. बागुल यांनी महिलेकडून पैसे काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ लाखांची मागणी केली.

अखेर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराने बागुल यांना पैसे कमी करण्यास सांगताच तडजोडीअंती ३५ हजार रुपयांवर बागुल तयार झाले. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होताच एसीबीने सापळा रचला. बागुल यांना ३५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही रक्कम त्यांच्याकडून ताब्यात घेत एसीबीकडून अधिक तपास सुरु आहे.  

टॅग्स :गुन्हेगारी