Join us

'नेटफ्लिक्स'च्या जगात वाचनाचा वेग वाढवा - अमृत देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 7:43 PM

अमृत देशमुख पुढे म्हणाले की, मी सीए झालो, पण ते काम सोडून दिले. तीन स्टार्ट अप सुरू केले.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई  : अनेकांना वाचनाचा कंटाळा येतो, पुस्तक वाचायला घेतले की झोपही येते, पण वाचणे आवश्यक आहे. वाचल्यामुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळते, असे प्रतिपादन वाचनालय चळवळीचे प्रणेते अमृत देशमुख यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, बोरिवली शाखा तसेच प्रबोधन गोरेगाव संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

अमृत देशमुख पुढे म्हणाले की, मी सीए झालो, पण ते काम सोडून दिले. तीन स्टार्ट अप सुरू केले. ते अपयशी ठरले. त्यानंतर मी जीवन संपविण्याचा विचार केला होता. त्यावेळी वाचनामुळे मलई नवीन दिशा मिळाली. आज माझ्याबरोबर 50 लाख लोक वाचन चळवळीतून जोडले गेले आहेत. दर बुधवारी मी पुस्तकांबद्दल लिहितो. ते 50 लाख लोकांपर्यंत पोहोचते. हा आनंद अवर्णनीय आहे.'नेटफ्लिक्स'च्या जगात वाचनाचा वेग वाढवा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रबोधन गोरेगाव संस्थेचे कार्याध्यक्ष कैलास शिंदे, माजी अध्यक्ष डॉ. मनोहर अदवानकर, सल्लागार सदस्य विजय नाडकर्णी, पांडुरंग पोखरकर, कोमसाप बोरिवली शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन मृदुला सावंत यांनी केले. त्यांनी अमृत देशमुख यांच्याशी संवाद साधून माहितीचा पट उलगडला. यावेळी कथालेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

टॅग्स :मुंबई