सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणास गती द्या, मुख्यमंत्री शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:29 PM2024-08-07T15:29:29+5:302024-08-07T15:30:05+5:30

या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Accelerate the beautification of Siddhivinayak temple, Chief Minister Shinde instructed in the review meeting | सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणास गती द्या, मुख्यमंत्री शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणास गती द्या, मुख्यमंत्री शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण व सोयीसुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत आहे. यावेळी यात्रीनिवास, पाच किलोमीटरचा कॉरिडॉर, दुकाने, पार्किंग, भाविकांसाठी दर्शनरांगा आदी विविध बाबींसंदर्भात मुख्यमंत्र्यांना सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यासाठी तांत्रिक बाबी तातडीने पूर्ण करून, येत्या गणेश चतुर्थीला कामांचा शुभारंभ करता येईल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Accelerate the beautification of Siddhivinayak temple, Chief Minister Shinde instructed in the review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.