Join us

मुंबईत खासगी रुग्णालयांतील लसीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर आता खासगी रुग्णालयांच्या निकष ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर आता खासगी रुग्णालयांच्या निकष पूर्ततेनंतर आता शहर उपनगरातील १३ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला वेग येत आहे. पालिका प्रशासनाने गुरुवारी आणखी तीन खासगी रुग्णालयांना लसीकरण प्रक्रियेसाठी मान्यता दिली. यात कोहिनूर, रहेजा आणि ग्लोबल रुग्णालयाचा समावेश आहे.

शहर, उपनगरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण एक हजार ७५३ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन लाभार्थींनी लस घेतली आहे, तर दुसऱ्या डोसकरिता ९८१ लाभार्थींना लस देण्यात आली. आतापर्यंत शहर, उपनगरात जसलोकमध्ये २४१, एचएन रिलायन्स ४५२, सैफी २५३, ब्रीचकँडी २२१, भाटिया ५०, लीलावती ७४, नानावती १५२, कोकिलाबेन १४१, फोर्टिस ३९ आणि हिरानंदानी रुग्णालयात ६० लाभार्थींनी लसीचा पहिला डाेस घेतला.

..............