कफ परेड स्थानकाच्या कामास गती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 01:16 AM2020-02-28T01:16:49+5:302020-02-28T01:17:10+5:30

कफ परेड स्थानकाच्या कामासह इतर कामांनाही गती

Accelerate the work of the Cuffe Parade Station | कफ परेड स्थानकाच्या कामास गती

कफ परेड स्थानकाच्या कामास गती

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी एकूण ५५ किमी लांबीचे भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ८० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हे काम १७ टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) साहाय्याने करण्यात येत आहे. तसेच कफ परेड स्थानकाच्या कामासह इतर कामांनाही गती आली आहे.

कफ परेड मेट्रो स्थानक दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांपैकी एक आहे. मेट्रो मार्गिकेवरील हे स्थानक जमिनीपासून २२ मीटर खोल असून त्याची अंदाजे लांबी ४०० मीटर आहे. या स्थानकाचे बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कफ परेडसह विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक ही स्थानकेदेखील पॅकेज-१ अंतर्गत येतात. आतापर्यंत या पॅकेजमधील ६२ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

Web Title: Accelerate the work of the Cuffe Parade Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो