शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:48 AM2020-01-05T00:48:38+5:302020-01-05T00:48:45+5:30
शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे.
योगेश जंगम
मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. या संपूर्ण प्रकल्पामध्ये तीन टप्प्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी २,१९६ पाईल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये तिसºया टप्प्यामध्ये उभारण्यात येणाºया पाईल्सच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या शंभर पाईल्सच्या पाया बांधणीचे (फाउंडेशन कास्टचे) काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे १८ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे तीन टप्प्यांमध्ये काम करण्यात येत आहे. शिवडी ते चिर्ले असे एकूण २२ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये शिवडीपासून १०.३८ कि.मी.पर्यंतच्या पहिल्या टप्प्यामध्ये १२०० पाईल्स पाण्यामध्ये उभारण्यात येणार आहेत. यापैकी आतापर्यंत ६०० पाईल्सचे काम पूर्ण झाले आहे. दुसºया टप्प्यामध्ये १०.३८ कि.मी. ते १८.१८७ कि.मी. (७.८०७ कि.मी.) दरम्यान आठशे पाईल्सपैकी ३०० पाईल्स उभारण्यात आले आहेत. तर तिसºया टप्प्यामध्ये १८.१८७ कि.मी. ते चिर्ले (३.६१३ कि.मी.) दरम्यान, शंभर पाईल्सच्या पाया बांधणीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. तिसºया टप्प्यामध्ये बहुतांश भाग हा पाण्याबाहेर जमिनीवर असल्याने पाईल्सच्या उभारणीसाठी शंभर पाया बांधणीचे (फाउंडेशन कास्टचे) काम पूर्ण करण्यात आले आहे. या संपूर्ण मार्गिकेसाठी एकूण २१९६ पाईल्स उभारण्यात येणार आहेत.
हा पूल देशातील सर्वात लांब पूल असणार आहे. एमएमआरडीएतर्फे प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाची एकूण लांबी २२ किमी आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च १७ हजार ८४३ कोटी रुपये इतका आहे. दोन्ही बाजूंकडील जमिनीवरील पुलाची एकूण लांबी ५.५ किलोमीटर इतकी आहे. खाडीवरील पुलाची लांबी १६.५ किमी इतकी आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी येथील बीपीटीच्या जागेवर, शिवाजीनगर आणि चिर्ले या ठिकाणी एमएमआरडीएने कास्टिंग यार्ड बनविले असून, येथे आवश्यक साधनसामग्री ठेवण्यात येणार आहे.
>शिवडी ते न्हावाशेवा अवघ्या वीस मिनिटांमध्ये
शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यावर, दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. या पुलावरून दरताशी शंभरच्या वेगाने प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पामध्ये वाहनांसाठी सहा लेन असणार आहेत, तर एक अतिरिक्त लेन आपत्कालीन व्यवस्थेसाठी आहेत़
>असा आहे मुंबई ट्रान्स
हार्बर लिंक प्रकल्प
लांबी- २२ कि.मी
समुद्रामध्ये- १६.५ कि.मी. लांबीचा पूल समुद्रामध्ये
जमीन- ५.५ कि.मी. जमिनीवर पुलाचा भाग
प्रकल्पाचा खर्च - १७,८४३ कोटी रुपये,
मार्गिका- सहा मार्गिका,
पूर्ण करण्याचा कालावधी- सप्टेंबर, २०२२