संकलित मूल्यमापन चाचणी शाळास्तरावरच घ्यावी, शिक्षक परिषदेची मागणी मान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 03:52 PM2018-03-12T15:52:11+5:302018-03-12T15:52:11+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणद्वारा राज्यस्तरावर घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी रद्द झाली असून आता शाळांनी त्यांच्या स्तरावरच चाचण्यांचे आयोजन करण्याचे पत्र आज विद्या प्राधिकरण ने निर्गमित केले असून शिक्षक परिषदेची मागणी मान्य झाली असल्याचे शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

Accepted evaluation test should be taken on the school level, the demand for teacher council is valid | संकलित मूल्यमापन चाचणी शाळास्तरावरच घ्यावी, शिक्षक परिषदेची मागणी मान्य 

संकलित मूल्यमापन चाचणी शाळास्तरावरच घ्यावी, शिक्षक परिषदेची मागणी मान्य 

googlenewsNext

मुंबई : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणद्वारा राज्यस्तरावर घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी रद्द झाली असून आता शाळांनी त्यांच्या स्तरावरच चाचण्यांचे आयोजन करण्याचे पत्र आज विद्या प्राधिकरण ने निर्गमित केले असून शिक्षक परिषदेची मागणी मान्य झाली असल्याचे शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 
राज्यस्तरावरून संकलित मूल्यमापनाच्या चाचणी परीक्षा रद्द करून शाळास्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात यावे, यासाठी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू व शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ९ मार्च रोजी भेट घेऊन पायाभूत व संकलित चाचण्या रद्द करण्याची मागणी केली होती शिक्षणमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याअनुषंगाने विद्या प्राधिकारने हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती तयार केल्या आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने महाराष्ट्रातील अभ्यासक्रमास अनुसरून सदर अध्ययन निष्पत्ती मध्ये बदल करून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती तयार केल्या आहेत. तसेच भारत सरकारच्या सूचनेनुसार यापुढे होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक व राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणे अध्ययन निष्पत्ती आधारित करावयाची आहेत. सदर बदल राज्यस्तरावरून करण्यात येण्यासाठी शिक्षण विभागाला तयारी करणे गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेतला गेला असून यामुळे शाळांनी त्यांच्या नियोजनाप्रमाणे संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याबाबत विद्या प्राधिकरणाने शाळांना सूचना दिल्या असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 
या निर्णयामुळे ज्या शाळांमध्ये विद्या प्राधिकरणाने निश्चित केलेली संकलित मूल्यमापन व शाळा स्तरावरची परीक्षा अशा दोन दोन परीक्षांना सामोरे जाण्याचा विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार असून शिक्षकांना देखील दोन परिक्षां ऐवजी एकाच परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार असल्याने शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले

Web Title: Accepted evaluation test should be taken on the school level, the demand for teacher council is valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.