Join us  

प्रवेश नाकारणा-या विद्यार्थ्यांनाही प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:07 AM

नियमानुसार पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय नाकारणारे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतात, परंतु यंदा त्यांच्यासाठी चौथ्या फेरीनंतर विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई : नियमानुसार पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय नाकारणारे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतात, परंतु यंदा त्यांच्यासाठी चौथ्या फेरीनंतर विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.६ आॅगस्ट रोजी अकरावीची चौथी यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. या यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर उपलब्ध जागांचा आढावा घेऊन, त्यानंतर या १५ हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, पण अजूनही प्रथम आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण बहुतांश विद्यार्थी प्रवेशाच्या प्र्रतीक्षेत आहेत. त्यांना चौथ्या यादीत प्रवेश मिळेल, परंतु महाविद्यालयात विषय नव्हता, महाविद्यालय आवडले नाही, अशा कारणांमुळे प्रवेश नाकारणाºया १५ हजार विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. कारण या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष प्रवेश यादीही जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्यार्थी आणि पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. चौथी यादी जाहीर झाल्यानंतर, या विद्यार्थ्यांसाठी विशेष यादी जाहीर करण्यात येईल. त्या यादीत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असेल. याबाबत लवकर निर्णय घोषित करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट केले आहे.