लांब पल्ल्याच्या प्रवाशांना उपनगरी रेल्वेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 01:41 AM2020-12-18T01:41:52+5:302020-12-18T01:42:29+5:30

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांकडे ज्या कोणत्याही बाहेरील ट्रेनसाठी वैध तिकीट असेल त्यांना लोकल ट्रेनचे तिकीट घेण्याची आणि लोकल ट्रेनने शहर व मुंबई महानगर प्रदेशातील कोठूनही गंतव्य ठिकाणी जाण्याची परवानगी आहे.

Access to long haul passengers to suburban trains | लांब पल्ल्याच्या प्रवाशांना उपनगरी रेल्वेत प्रवेश

लांब पल्ल्याच्या प्रवाशांना उपनगरी रेल्वेत प्रवेश

googlenewsNext

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने मंजूर केल्यानुसार, लांब पल्ल्याच्या  गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांकडे ज्या कोणत्याही बाहेरील ट्रेनसाठी वैध तिकीट असेल त्यांना लोकल ट्रेनचे तिकीट घेण्याची आणि लोकल ट्रेनने शहर व मुंबई महानगर प्रदेशातील कोठूनही गंतव्य ठिकाणी जाण्याची परवानगी आहे. बाहेरील ट्रेनमधून डी-बोर्डिंग करणारे प्रवासी लोकल ट्रेनचे तिकीट खरेदी करून मुंबई, एमएमआर विभागातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करू शकतात. रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकारने मुभा दिलेल्या प्रवाशांनाच उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. हा प्रवास करताना कोरोनाचे सगळे नियम पाळावे लागतील.

Web Title: Access to long haul passengers to suburban trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.