मुंबई : आता एखाद्या विद्यार्थ्याने क्लिक फॉर प्रोसीड हा पर्याय निवडला असला तरी त्या विद्यार्थ्याचा प्रवेश महाविद्यालयांना अपडेट करता येणार नाही कारण प्रवेश देताना विद्यार्थ्याची मूळ कागदपत्रे आणि फी भरल्यानंतरच प्रवेश आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अपडेट करण्याच्या सूचना उपसंचालक कार्यालयातून महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. जर मूळ कागद पत्राअभावी महाविद्यालयांनी प्रवेश दिले तर कायदेशीर कारवाई केली जाइल असा इशारा शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिला आहे.गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्याचा अकरावी आॅनलाइन प्रवेश थेट कन्फर्म करणाऱ्या महाविद्यालयांना चाप बसवण्यासाठी आणलेला क्लिक फॉर प्रोसीड हा नवा पर्याय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. मात्र प्रवेश घ्यायचा नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी या पयार्यामधील एस क्लिक केल्यामुळे अकरावीच्या पहिल्या यादीनंतर गोंधळ उडाला आहे. प्रवेश पुन्हा अनिश्चित करण्यासाठी उपसंचालक कार्यालयापुढे विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. हा गोंधळ लक्षात घेऊन उपसंचालकांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांना दिलासाआता यापुढे एखाद्या विद्यार्थ्याने क्लिक फॉर प्रोसीड हा पर्याय निवडला असला तरी त्याचा प्रवेश महाविद्यालयांना तत्काळ अपडेट करता येणार नाही. त्या विद्यार्थ्याची मूळ कागदपत्रे आणि फी भरल्यानंतरच प्रवेश आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अपडेट करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
मूळ कागदपत्राशिवाय प्रवेश निश्चिती नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 6:27 AM