महामार्गावर गॅस टँकरला अपघात

By admin | Published: April 5, 2015 10:33 PM2015-04-05T22:33:40+5:302015-04-05T22:33:40+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी मोहोप्रे गावच्या हद्दीत एलपीजी या भरलेल्या टँकरला गोव्याच्या दिशेने जात असताना वळणावर पलटी

Accident on gas tanker on the highway | महामार्गावर गॅस टँकरला अपघात

महामार्गावर गॅस टँकरला अपघात

Next

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी मोहोप्रे गावच्या हद्दीत एलपीजी या भरलेल्या टँकरला गोव्याच्या दिशेने जात असताना वळणावर पलटी होवून अपघात झाला आहे. सुदैवाने टॅँकरमधून गॅस गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
आज सकाळी ११ च्या सुमारास उरण येथून एलपीजी गॅस घेवून निघालेला टॅँकर (एमएच १२ केपी २८९७) गोव्याच्या दिशेने जात असताना महाड तालुक्यातील मोहोप्रे गावच्या हद्दीत आला असता एका अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या मधोमध टँकर पलटी झाला. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसून महत्त्वाची बाब म्हणजे एलपीजी गॅसने भरलेल्या या टँकरमधून गॅस गळती न झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय या ठिकाणी आला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. तसेच आपत्ती व्यवस्थापन म्हणून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब तसेच रुग्णवाहिका तैनात करण्यात आली नव्हती. या महामार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. परंतु या अपघातानंतर शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा जो हलगर्जीपणा दाखवण्यात आला व पोलिसांचा या प्रकरणी निष्काळजीपणा समोर आला. जर या ठिकाणी टॅँकर गॅस गळतीने स्फोट झाला असता तर होणाऱ्या जीवित व वित्तहानीला कारणीभूत ठरला असता. (वार्ताहर)

Web Title: Accident on gas tanker on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.