मुंबई : वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी १६ जुलै रोजी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने कारागृहाची पाहणी केली. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाशी संबंधित सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले. या वेळी नागपाडा पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाची माहिती त्यांना दिली. गेले तीन दिवस त्यांनी कारागृहात अंतर्गत चौकशी केली. गुरुवारी ते रवाना झाले. त्यापाठोपाठ ही घटना घडली. ते असताना हा प्रकार घडला असता तर याचे तीव्र पडसाद उमटले असते.असे देतात जेवण...कारागृहातील कैद्यांसाठी कारागृहात जेवण बनविण्यात येते. ते बनविल्यानंतर कारागृह अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी जेवणाची तपासणी करतात. त्यानंतर ते कैद्यांना देण्यात येते. पुरुष आणि महिला दोन्ही कैद्यांना समान जेवण दिलेजाते.>शुद्ध पाण्याचा पुरवठाबाधाप्रकरणानंतर कारागृहातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत कैद्यांना कारागृहातील पाणी देणे बंद करण्यात आले आहे. त्यांना बाहेरुन शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच कारागृह आवारात स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत असल्याचे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महारानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले.
आयोगाची पाठ फिरताच दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 6:21 AM