Join us

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे घडली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:06 AM

- खासदार गोपाळ शेट्टी यांचा आरोपलाेकमत न्यूज नेटवकमुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी हा झाेपडपट्टी परिसर आहे. येथे ...

- खासदार गोपाळ शेट्टी यांचा आरोप

लाेकमत न्यूज नेटवक

मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी हा झाेपडपट्टी परिसर आहे. येथे घडलेल्या दुर्घटनेस मुंबई शहराचे पालकमंत्री व स्थानिक आमदार अस्लम शेख तसेच उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे दुर्लक्ष व बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली, असा आराेप उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला. दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार गाेपाळ शेट्टी यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जुलै २०२० मध्ये येथे बांधकाम कोसळल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून योजना आखावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडे २० ऑगस्ट २०२० राेजी पत्राद्वारे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने

पुन्हा एकदा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले, असा आरोप त्यांनी केला.

------------