Join us

विनापरवाना वाहन चालकांमुळे घडले १ हजार ६१६ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:07 AM

६०२ जणांचा मृत्यू; राज्यभरातील २०१८ची आकडेवारी

मुंबई : अनेक चालक विनापरवाना वाहन चालवतात. २०१८मध्ये अशा विनापरवाना वाहन चालकांकडून १,६१६ अपघात घडले असून, यात ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २०१८मध्ये झालेल्या विविध ३५,७१७ अपघातांमध्ये १२,०९८ जणांचा मृत्यू झाला. यात १२,६४८ जण गंभीर जखमी, तर ६,५८५ किरकोळ जखमी झाले. यामध्ये परवाना असलेल्या वाहन चालकांकडून २९,९५८ अपघात घडले. यात १०,०३३ जणांना जीवास मुकावे लागले. १०,६२२ गंभीर जखमी झाले, तर प्रवासादरम्यान अन्य ५,३९५ जणांना किरकोळ दुखापत झाली.विनापरवाना वाहन चालकांकडून १,६१६ अपघात घडले. यामध्ये ६०२ जणांचा जीव गेला. ५२४ गंभीर जखमी झाले, तर २९८ जणांना किरकोळ दुखापत झाली.

अज्ञात वाहन चालकांकडून २,३२२ अपघात घडले. यामध्ये ९०९ जणांचा मृत्यू, ७६५ गंभीर जखमी, तर ४८४ किरकोळ जखमी झाले. इतर ७३० अपघातांमध्ये १८५ जणांनी जीव गमावला. ३५२ जण गंभीर जखमी झाले, तर १५० जणांना किरकोळ दुखापत झाली.शिकाऊ चालकांमुळे ३६९ जणांचा मृत्यू२०१८ मध्ये झालेल्या एकूण अपघातांपैकी शिकाऊ वाहन परवाना चालकांकडून १,०९१ अपघात घडले. यामध्ये ३६९ जणांचा मृत्यू झाला. ३८७ गंभीर व २५८ किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :मुंबईअपघात