Join us

लालबाग उड्डाणपुलावर अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 15:26 IST

बिसलरी बॉटल्सने भरलेला ट्रक उलटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी 

मुंबई - लालबाग उड्डाण पुलावर आज सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास बिसलेरी बॉटल्सने भरलेला ट्रक उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या अपघात ट्रकचा चालक आणि क्लिनर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

लालबाग उड्डाण पुलावरून परळच्या दिशेने जाणारा ट्रक कलंडला आणि हा अपघात झाला असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस पोचल्यानंतर त्यांनी जखमी चालक आणि क्लिनरला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतुकीची कोंडी झाल्याने इतर वाहने पुलावरून खालच्या रोडवरून वळविण्यात आली होती. तसेच क्रेनच्या सहाय्याने ट्रक उचलण्याचे काम सुरु आहे. सकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. 

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडीपोलिसअपघात