Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 10:29 PM2022-07-05T22:29:56+5:302022-07-05T22:30:05+5:30

मुंबई महापालिकेजवळ हा अपघात झाला, सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

Accident of CM Eknath Shinde convoy near BMC Headqurter | Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित

Next

मुंबई: महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.  एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाला. मुंबई महापालिकेजवळ झालेल्या या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले, पण सुदैवाने यात कोणालाही हानी झाली नाही. मुख्यमंत्रीदेखील सुरक्षित आहेत.

स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे जात होते. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागू जोरदार धडक दिली. पुढची कार अचानक थांबल्याने मागची कार आदळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगर पट्ट्यातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यातच पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Accident of CM Eknath Shinde convoy near BMC Headqurter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.