चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 21:25 IST2020-01-24T21:24:39+5:302020-01-24T21:25:55+5:30
वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला.

चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला
मुंबई - मुलुंड येथील भक्तिमार्ग परिसरामध्ये महानगर एलपीजी गॅसची गळती झाल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुपारी बाराच्या सुमारास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू होते. एका कर्मचाऱ्याकडून पाईपलाईनचे काम करताना महानगर गॅसचा पाईप चुकून कापला गेला. त्याचवेळी दुसरा कर्मचारी त्याठिकाणी वेल्डिंग काम करत होता. वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला.
या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्याकडेला असलेले झाड या आगीच्या विळख्यात आले आणि जळालं. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गॅस पुरवठा खंडित करून ही आग तासाभरात आटोक्यात आणली. मात्र, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. आगीवर तासाभरात नियंत्रण मिळविण्यात आले.