गुजरात महाराष्ट्र सीमेवर अपघात, ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
By admin | Published: November 2, 2016 01:20 PM2016-11-02T13:20:20+5:302016-11-02T13:22:01+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावर आच्छाड येथे बुधवारी सकाळी एका इसमाला इंडिका कारने उडवल्याने त्याचा मृत्यू झाला
Next
सुरेश काटे, ऑनलाइन लोकमत
तलासरी, दि. २ - मुंबई अहमदाबाद महामार्गावर आच्छाड येथे बुधवारी सकाळी एका इसमाला इंडिका कारने उडवल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त गावक-यांनी महामार्गावर रास्ता रोको केला.
अल्केश छगन सागरे या पंचवीस वर्षीय(वय २५) असे मृत युवकाचे नाव असून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या इंडिका कारने उडविले. त्यात अल्केश गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
आच्छाड येथे कारखाने असून येथे महामार्गा वर कामगाराची मोठी वर्दळ असते तसेच तेथे नेहमी मोठे अपघात होत असल्याने त्यामुळे आच्छाड येथे उड्डाण पूल बांधावा अशी ग्रामस्थानि वारंवार मागणी केली पण आय आर बी ने या कडे नेहमी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले. आज सकाळी झालेल्या या अपघातानंतर आच्छाड येथील ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला अन ग्रामस्थ रस्त्यावर उतरून त्यांनी महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
अपघातानंतर तात्काळ तलासरी पोलीस घटना स्थळी पोहचले तसेच आमदार पास्कल धनारे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आयआरबीचे अधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्ग मोकळा केला.