मुंबईतही ‘लोकमत’च नंबर वन; प्रतिस्पर्ध्यांपेक्षा घेतली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:00 AM2020-01-04T05:00:42+5:302020-01-04T06:40:01+5:30

पहिल्या पसंतीचे दैनिक होताना वाचकसंख्येत घसघशीत वाढ

according to indian readership survey lokmat tops in mumbai | मुंबईतही ‘लोकमत’च नंबर वन; प्रतिस्पर्ध्यांपेक्षा घेतली आघाडी

मुंबईतही ‘लोकमत’च नंबर वन; प्रतिस्पर्ध्यांपेक्षा घेतली आघाडी

Next

मुंबई : मुंबईसह राज्यातील बातम्यांचे नेमकेपण जपणाऱ्या, मुंबई आणि परिसराच्या कानाकोपºयातील सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या दैनिक ‘लोकमत’ने वाचकसंख्येचा मोठा पल्ला गाठला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या ताज्या आकडेवारीनुसार ‘लोकमत’ने मुंबईत १७ लाख ४० हजार वाचकसंख्येचा टप्पा गाठत वाचकांच्या पहिल्या पसंतीचे दैनिक होण्याचा मान पटकावला आहे.

मुंबई आणि परिसरात सर्वदूर पसरलेल्या वार्ताहरांच्या जाळ्याद्वारे दररोजच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यात ‘लोकमत’ने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर, तज्ज्ञांंमार्फत केल्या जात असलेल्या विश्लेषणामुळे ‘लोकमत’च्या वाचकांना नित्यनवीन माहितीचा साठा उपलब्ध होतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ‘लोकमत’च्या वाचकसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ.

प्रत्येक तिमाहीत होते वाढ 
प्रत्येक तिमाहीत ‘लोकमत’च्या वाचकांची संख्या वाढत असून आता ‘लोकमत’ने इतर मराठी भाषिक वृत्तपत्रांबरोबरच प्रादेशिक भाषांतील वर्तमानपत्रांनाही मागे टाकले आहे. ‘लोकमत’ने एकंदर सरासरीचा विचार करता पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित राखले आहे. ‘लोकमत’ची सरासरी वाचकसंख्या ६१ लाख ४६ हजार आहे. यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी ही सरासरी वाचकसंख्या ६० लाख १४ हजार एवढी होती. तर त्याआधी ती ५९ लाख ८८ हजार एवढी होती; यात २.६ टक्क्यांची वाढ झाली आणि हा आकडा ६० लाख १४ हजारांवर पोहोचला होता.

महिला वाचक वाढले
‘लोकमत’च्या महिला वाचकांची मुंबईतील संख्या सर्वाधिक म्हणजेच ६ लाख ४ हजार एवढी आहे. ही वाचकसंख्या केवळ मराठी भाषिक वर्तमानपत्रापुरती मर्यादित नसून, प्रादेशिक वृत्तपत्रांचा विचार करता या वाचकवर्गात मुंबईत ‘लोकमत’ने पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे.

युवकांची पसंती ‘लोकमत’लाच
युवावर्गातील वाचकांचा विचार करता १२ ते १९ या वयोगटातील तरुण अन्य मराठी भाषिक वर्तमानपत्रांऐवजी ‘लोकमत’ वाचण्यास प्राधान्य देत आहेत. ‘लोकमत’ वाचत असलेल्या युवावर्गाची संख्या २ लाख ८३ हजार एवढी आहे.
विशेषत: निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या तरुणांचा विचार करता म्हणजे २० ते ३९ या वयोगटातील युवा वाचकांचा विचार करता हे तरुण ‘लोकमत’ वाचण्यास प्राधान्य देत आहेत.
ही वाचकसंख्या ८ लाख ८९ हजार आहे. विशेष बाब म्हणजे ही वाचकसंख्या कोणत्याही मराठी भाषिक वृत्तपत्र आणि प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रांच्या तुलनेत अधिक आहे.

मुंबईतील झेप (वाचकसंख्येतील वाढ टक्क्यांमध्ये)
10.83 लोकमत
5.80 महाराष्ट्र टाइम्स
2.96 लोकसत्ता

 

Web Title: according to indian readership survey lokmat tops in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.