प्राथमिक चौकशीनुसार चूक रुग्णालय प्रशासनाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:06 AM2021-03-27T04:06:18+5:302021-03-27T04:06:18+5:30

पाेलीस आयुक्त; सखाेल चाैकशी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक ...

According to the preliminary inquiry, it was the fault of the hospital administration | प्राथमिक चौकशीनुसार चूक रुग्णालय प्रशासनाचीच

प्राथमिक चौकशीनुसार चूक रुग्णालय प्रशासनाचीच

Next

पाेलीस आयुक्त; सखाेल चाैकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक चौकशीत रुग्णालय प्रशासनाची चूक दिसत असल्याचे सांगून याच्या सखोल चौकशीनंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची वर्दी लागताच भांडूप पोलीस आणि अग्निशमन दल तेथे दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत येथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील, अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत रुग्णालयाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नगराळे यांनी सांगितले.

तर, अग्निशमन दलाकडून अहवाल प्राप्त होताच, त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंद करून दाेषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली.

....................

Web Title: According to the preliminary inquiry, it was the fault of the hospital administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.