नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

By मनोहर कुंभेजकर | Published: September 26, 2022 03:40 PM2022-09-26T15:40:53+5:302022-09-26T15:41:40+5:30

वॉचडॉग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

According to the color guide of Navratri, the protest was done by filling the potholes | नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई-मुंबईच्या खड्यांची सद्यस्थिती ही रस्त्यात खड्डे,खड्यात रस्ते असून मुंबईकर  संपूर्ण मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येला कंटाळले आहेत.पालिका प्रशासन,एमएमआरडीए,एमएसआरडीसी यांच्यात समन्वय नसल्याने मुंबईत जागोजागी खड्डे आहेत.परिणामी एकीकडे मुंबईकरांची हाडे खिळखिळी होतांना दुसरीकडे मुंबईकरांना ट्रॅफिक जाम समस्येला सामोरे जावे लागत आहे. करदात्या मुंबईकरांना  दरवर्षी शेकडो कोटी जादा खर्च सोसणाऱ्या या सार्वजनिक संकटावर आम्हाला कायमस्वरूपी उपाय हवे आहेत. त्याशिवाय इंधनाचा अपव्यय, वाहतूक कोंडी, जीवितहानी आदी समस्या कमी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि लवकर मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करा या मागणीसाठी आज दि, २६ सप्टेंबर पासून दि,४ ऑक्टोबर पर्यंत साजरा होणाऱ्या  नवरात्री २०२२ वॉचडॉग फाउंडेशन कलर गाईडनुसार खड्डे बुजवून नवरात्रीत
अनोख्या पद्धतीने खड्डेनवमी साजरी करणार आहे.वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस आल्मेडा यांनी लोकमतला ही माहिती दिली.

मुंबईत आज नवरात्रौत्सवाचा पहिल्या दिवशी दि,२६ सप्टेंबर रोजी अंधेरी पूर्व,मरोळ येथील एअरपोर्ट रोड स्टेशनच्या खाली दुपारी १ ते २ यावेळेत मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्यांवर वॉचडॉग फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी  नवरात्री च्या पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाने खड्डे रंगवाले आहेत.तसेच नवरात्रीत उर्वरित दिवसाच्या कलरकोड प्रमाणे खड्डे रंगवण्यात येतील. आणि विजयादशमीला मुंबईला खड्यात घालणाऱ्या रोड कंत्राटदारांच्या प्रतिमेचे दहन करण्यात येईल
अशी माहिती अँड.गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस आल्मेडा यांनी दिली.
 
नऊ दिवस खास कलरकोड प्रमाणे टी शर्ट वॉचडॉग फाउंडेशनने तयार केले असून या नऊ दिवसांमध्ये उर्वरित दिवसांच्या कलरकोड प्रमाणे मुंबईकरांच्या रस्त्यांची दुर्दशा अधोरेखित करण्यासाठी सर्व मुंबईकरांना वरील पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन वॉचडॉग फाउंडेशनने केले आहे. मुंबईकरांनी नऊ दिवस दररोज रंगीत खड्ड्यांचे फोटो काढण्याचे आणि महानगरपालिकेच्या "माय बीएमसी" च्या अधिकृत ट्वीटर हँडलवर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: According to the color guide of Navratri, the protest was done by filling the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.